कालच उदघाटन झालेली नवीन बंगळूर ते बेळगाव रेल्वे आज दोन तास उशिरा आली आहे.
काळ रात्री 9 वाजता निघालेल्या या रेल्वेतील पहिल्याच प्रवाशांना अपेक्षा होती की आपण किमान सकाळी 7.30 पर्यंत बेळगावला पोहोचू कारण बेळगावला पोचण्याची वेळ होती सकाळी 7 पण ही रेल्वे दोन तास उशीर करून सकाळी 9 वाजता बेळगावला पोचली आहे. प्रवाशांना सलग 12 तास प्रवास करावा लागला आहे.
अलविन या प्रवाशाने हा प्रवास फारच कंटाळवाणा झाला असे म्हटले असून एसी कोच मध्ये कालच्या पावसाने पाणी शिरल्यामुळे पाणीतूनच प्रवास करावा लागल्याचे सांगितले आहे. यामुळे तात्काळ हा शब्द बदलून विलंब असे नामकरण या रेल्वेच्या बाबत करावे अशी मागणी वाढली आहे.
सदर रेल्वे खाजगी बस पेक्षा लवकर येणे अपेक्षित आहे असे न झाल्यास अनेक प्रवाश्यांचा भ्रम निरास होऊ शकतो.