जागतिक उष्मा वाढ ही आता साऱ्या जगाची समस्या झाली आहे. शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुके हवामान बदलत आहे. कधीही पडणारा पाऊस, अतिउष्ण उन्हाळा आणि अति थंड हिवाळा असे वातावरण बनत असून विकासातून नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. झाडे तोडून आणि जंगल नाहीसे करून परिस्थिती आपणच चिंताजनक करून ठेवली आहे.
या बद्दल जागृती निर्माण करून या समस्येकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या बुधवार दि 5 रोजी एक अभिनव उपक्रम बेळगावमध्ये होत आहे. दुपारी 1 वाजता सुवर्ण जे एन एम सी ऑलिंपिक जलतरण तलावापासून सुरू होऊन गोवावेस येथे या उपक्रमाची सांगता होणार आहे.
एक आव्हानात्मक उपक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. भारत पाटील हा मुलगा विविध 20 क्रीडा प्रकार सादर करून ही जागृती करणार आहे. यात पोहणे, पळणे, चालणे, सायकल चालवणे, डायविंग, स्केटिंग, जिम्नॅस्टिक, हाताने चालणे, रोप क्लायबिग असे सलग आठ तास हा उपक्रम चालणार आहे.
थांबा आणि जागतिक उष्मा वाढीचा विचार करा, या थीम वर हा उपक्रम चालणार आहे.
युनिक स्पोर्टिंग अकादमी, जायंट्स, रोटरी वेणूग्राम, कोल्हापूर कन्या मंडळ, एस के इंटरनॅशनल स्पोर्ट्स अकादमी, मारवाडी युवा मंच, कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत, आबा स्पोर्ट्स क्लब, एकवा ग्रुप व इतर अनेक संघटना यात भाग घेत आहेत. जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांच्या हस्ते व सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या उपस्थितीत उदघाटन होईल.