पापा कहते है बडा नाम करेगा।बेटा हमारा ऐसा काम करेगा। हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. असंच मोठ्ठं काम आपल्या बेळगावच्या अर्थात मच्छे येथील तरुणाने करून दाखविले आहे. लष्करात शिपाई पदावर भरती होऊन क्लार्क पदावर काम करून आज तो आपली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर लेफ्टनंट बनत आहे. त्यासाठीच्या चार वर्षीय प्रशिक्षणासाठी या सुपुताची निवड झाली असून बेटा हमारा लेफ्टनंट बनेगा । असे म्हणत त्याच्या आई वडिलांचा उर अभिमानाने भरून आला असेल….
लान्स नायक ही त्याची सध्याची पदवी. नंदकुमार धाकलू पाटील हे त्याचे नाव.डोग्रा इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये तो क्लार्क पदावर काम करीत होता. 1 जुलै पासून इंडियन मिलिटरी अकादमी देहरादुन येथे त्याचे प्रशिक्षण सुरू होत आहे. अतिशय संघर्षाची वाटचाल करीत त्याने ही मजल मारली आहमच्छे येथेच मराठी माध्यमात दहावीपर्यंत शिक्षण घेऊन, बारावी ज्योती कॉलेज मध्ये तर भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये बीकॉम पर्यंत शिक्षण त्याने घेतले आहे. पदवी काळात एनसीसी व एनएसएस मध्येही त्याचा सहभाग होता. पदवी पूर्ण केल्यावर बेळगाव मध्ये गारमेंट दुकान व बिग बाजार मध्ये सेल्समन म्हणूनही त्याने काम केले. हॉटेल मध्ये काम करीत तसेच वेगा हेल्मेट प्लांट मध्येही त्याने काम करीत शिक्षण घेतले आहे. काहीकाळ एल आय सी मध्ये एजंट म्हणूनही काम केले आहे.लहानपणा पासूनच आपले लष्करात भरती होण्याचे आणि अंगावर लष्करी युद्ध युनिफॉर्म घालण्याचे माझे स्वप्न होते असे त्याने बेळगाव live ला सांगितले. 21 सप्टेंबर 2015 मध्ये शिपाई म्हणून तो लष्करात दाखल झाला होता.
4 वर्षे सर्व्हिस झाली, याकाळातही तो स्वस्थ बसला नाही. त्याने सर्व्हिस एन्ट्री परीक्षा दिली. आता या परीक्षेत घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याची 4 वर्षे ट्रेनिंग साठी निवड झाली असून तो लेफ्टनंट बनणार आहे.या परीक्षेत त्याने अखिल भारतात तिसरा क्रमांक मिळवला आहे. एकूण 15000 उमेदवार या परीक्षेला बसले होते, त्यापैकी फक्त 37 उत्तीर्ण झाले असून त्यात नंदकुमार तिसरा आला आहे.
लेफ्टनंट पदी निवड झाली ही त्याच्या आजवर केलेल्या संघर्षाची पोचपावती आहे.डोग्रा रेजिमेंटचे अधिकारी प्रशिक्षण काळातील उत्साद, प्राथमिक माध्यमिक शाळेतील कॉलेज चे शिक्षक,ज्योती करियर अकॅडमी आणि आई वडिलांच्या मार्गदर्शनामुळे मी हे करू शकलो असे त्याचे म्हणणे आहे.
कॉलेज काळात संघर्ष करीत केलेले प्रयत्न कामाला आले आहेत.त्याचे वडील खासगी बसवर ड्रायवर होते ते आता निवृत्त झाले आहेत.आई हाऊस वाईफ आहे.मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन त्याने मिळविलेले यश बेळगावच्या नागरिकांना अभिमानाचे आहे.
जब तक सफल ना हो चैन की नींद त्यागो।
संघर्षो को छोड़कर मैदान से मत भागो।
कुछ किये बिना जयजयकार नही होती।
कोशिश करनेवालों की कभी हार नही होती।
जितना बढ़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी।
त्यांच्या दहावीच्या वर्ग मित्रांनी सत्कार केला त्यावेळी इतरांना प्रेरणा म्हणून त्याने या लाईन म्हणून दाखवल्या आहेत त्या आर्मीत भरती होऊन देश रक्षण करण्याचे ध्येय बाळगलेल्या बेळगावतल्या युवकांना प्रेरणा ठरो…