शहरापासून जवळच असलेल्या मुख्यमंत्री कुमारस्वामी लेआउट परिसरातील रस्त्यांची वाताहत झाली होती. ही बातमी बेळगाव live ने प्रसिद्ध केली होती. याची दखल प्रशासनाने घेतली असून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
एका मुख्यमंत्री असलेल्या लेआऊटच्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यामुळे संताप व्यक्त होत होता. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नावे असलेल्या लेआउट मधेच अशी परिस्थिती आहे तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.
कुमारस्वामी लेआउट समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यातून प्रवास करताना नागरिकांना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुले बेळगाव live च्या माध्यमातून यावर प्रकाश टाकला होता. आता हा रस्ता चकाचक करण्यात आला आहे.
बॉक्साईट रोड मार्गे येणाऱ्या कुमारस्वामी लेआऊट समोरील भागात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. मोठमोठे खड्डे पडल्याने छोटे मोठे अपघात घडत होते. त्यामुळे हा रस्ता तातडीने करावा अशी मागणी होत होती. नागरिकांची मागणी लक्षात घेत बेळगाव live ने उचलून धरला. आणि त्यांची ही मागणी प्रशासनाने मान्य केली आणि रस्ता केला.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने रस्त्याची डागडुजी केली . याचबरोबर रस्त्यावर भरलेल्या खड्ड्यांमध्ये माती न टाकता डांबर घालून रस्ता करण्यात आला आहे.