Wednesday, May 8, 2024

/

जिजामाता चौकातल्या रस्त्यावरील सांडपाण्याची दखल

 belgaum

किरकोळ झालेल्या पावसा मुळे फोर्ट रोड वरील जिजामाता चौकात भर रस्त्यावर सांडपाणी आले होते याचा त्रास अनेकांना सहन करावा लागला होता अखेर याची लोकप्रतिनिधी कॅटोंमेंट आणि पालिका अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे.

शुक्रवारी सायंकाळी उत्तर भागाचे आमदार अनिल बेनके,कॅटोंमेंट बोर्डाचे साजिद शेख महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर आदींनी भेट देऊन पाहणी केली.जिजामाता चौकातील ती गटार सी डी छोटी असल्याने या भागातील केर कचरा त्यात साचत आहे त्यामुळे सांडपाणी पुढे जात नसल्याने तुंबत असून अर्धा फोर्ट रोड आणि रस्त्यावर येत असल्याचे निदर्शनास आले.

Jijamata chowk
फोर्ट रोड परिसरातील दुकानदार दुकानाती कचरा कचरा कुंड मध्ये टाकण्या ऐवजी गटारीत टाकतात केवळ या गटारीत केवळ कचरा नसून प्लस्टिक सीट कव्हर कुशन कव्हर टाकतात त्यामुळे गटारी बंद होऊन ही समस्या निर्माण होत आहे त्यामुळे या भागातील दुकान दारांनी देखील भान बाळगणे गरजेचे आहे असे मत कॅटोंमेंटचे साजिद शेख यांनी मांडले.

 belgaum

सध्या कॅटोंमेंट सी ई ओ बदली झाल्याने काम जलद होण्यास अडचणी असून आमदारांनी यात पुढाकार घ्यावा अशी विनंती कॅटोंमेंटच्या वतीने शेख यांनी केली असता आमदार निधीतून नवीन मोठ्या सी डी वर्क साठी काम करण्याचे आश्वासन बेनके यांनी दिले त्यावर कॅटोंमेंट कडून एन ओ सी पत्र लवकर देऊ असे शेख यांनी सांगितले.लवकर नवीन गटार करण्यात येणार असून ही समस्या मार्गी लागणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.