Wednesday, January 8, 2025

/

अपघातातील त्या दोघा जखमींचे देखील निधन

 belgaum

बेळगाव शहरातील श्रीनगर गार्डन जवळील झालेल्या अपघातातील मयतांचा आकडा वाढला असून  गंभीर जखमी असलेल्या औरंगाबाद येथील दोघांचा देखील उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

महेश नंदू पाडळे वय 28 आणि गोपीनाथ कडोबा वरकड वय 29 अशी गंभीर जखमी होऊन इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झालेल्या युवकांची नावे आहेत. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता घटनास्थळी नंदू किशनराव पवार वय 28,अमोल निले 26, सुरेश  कन्हेरे वय29, अमोल रमेश चावरे  वय 26,महेश चावरे वय 28 सर्वजण रा. देवगिरी औरंगाबाद हे पाच जण ठार झाले होते.

प्रवासाच्या सुरुवातीला शेवटचा सेल्फी

औरंगाबाद येथून प्रवासाला निघालेल्या त्या सात जणांचा सेल्फी हा त्या सात जणांच्या जीवनातला अखेरचा सेल्फी ठरला आहे. बेळगावजवळ दुःखद अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. या सेल्फीतील त्यांचे हसरे चेहरे एक क्षणाच्या त्या अपघाताने रक्ताने माखले होते . औरंगाबाद हुन त्यांचे नातेवाईक बेळगावला पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत.रविवारी रात्री उशीरा मयतांचे नातलग बेळगावला पोचणार आहेत त्या नंतर उद्या सोमवारी सकाळी मृतदेह औरंगाबाद नेण्यात येणार आहेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.