Saturday, December 28, 2024

/

किल्ला मार्केट मध्ये तणावपूर्ण वातावरण

 belgaum

कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट मध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ-सकाळीच अस्वस्थ वातावरण तयार झाले आहे, व्यापारी जमू लागले आहेत, आम्ही एपीएमसीला जाणार नाही हा त्यांचा पवित्रा कायम असताना आता एपीएमसी मध्ये भाजी आवक सुरू झाली आहे, भाजीचे दोन टेम्पो एपीएमसी मध्ये दाखल झाले आहेत.

किल्ला येथील कॅटोंमेंट भाजी मार्केट कडे भाजी घेऊन येणाऱ्या सर्व गाडया पोलिसांनी ए पी एम सी कडे वळवल्या आहेत त्यामुळे नेहमी भाजीच्या गाड्यांनी भरलेलं भाजी मार्केट खाली दिसत असल्याचे चित्र आहे.जिल्हा प्रशासनाने आज मंगळवार पासून किल्ला भाजी मार्केट ए पी एम सी मार्केट यार्ड मध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी भाजी मार्केट परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे एकूणच किल्ला मार्केट मध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.

Killa market

बेळगाव शहराच्या पूर्व भागातून येणाऱ्या भाजी पाल्याच्या मोठ्या गाड्या टेम्पो अलारवाड क्रॉस जवळ ,ओल्ड पी रोड उड्डाण पूल सर्किट हाऊस आणि राष्ट्रीय महामार्ग जवळ अनेक ठिकाणी अडवून त्या गाड्या ए पी एम सी मार्केट कडे पाठवल्या आहेत.मंगळवारी सकाळी अकरा वाजे पर्यंत मार्केट मध्ये केवळ व्यापारी लहान मोठे दलाल आणि काही प्रमाणात शेतकरी जमले आहेत.लहान मोठ्या दुचाकी किंवा बस मधून विक्रीला येणारा भाजी पाला देखील या मार्केट मध्ये आला नसुन पोलिसांनी याला देखील शहर मार्केट आणि ए पी एम सी कडे वळवले आहे.

किल्ला येथील कॅटोंमेंट व्होलसेल भाजी मार्केट ए पी एम सी मध्ये शिफ्ट करण्यास भाजी पाला व्यापारी संघ लहान मोठे दलाल व्यापारी आणि शेतकऱ्यांनी देखील विरोध दर्शवला आहे.कालच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून त्यांनी शासनाच्या या कृत्याचा निषेध केला होता.

Tense killa market

दरम्यान व्यापारी संघटनेचे वकील भाजी मार्केट कार्यालयात आले असून त्यांनी कोणीही व्यापारी शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले असून आंदोलनाची पुढील रूपरेषा 12 पर्यंत ठरवू तो पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे कळवले आहे. दरम्यान सर्व व्यापारी एकत्रित जमले असून लढा देऊ आणि शासनाची हुकूमशाही मोडून काढू अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

एपीएमसीत आवक सुरू

कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट मध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ-सकाळीच अस्वस्थ वातावरण तयार झाले आहे, व्यापारी जमू लागले आहेत, आम्ही एपीएमसीला जाणार नाही हा त्यांचा पवित्रा कायम असताना आता एपीएमसी मध्ये भाजी आवक सुरू झाली आहे, भाजीचे अनेक टेम्पो एपीएमसी मध्ये दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.