Saturday, November 16, 2024

/

सुरेश अंगडींचा विजयी चौकार

 belgaum

प्रतिष्ठेची म्हणून ओळखल्या गेलेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश अंगडी यांनी तीन लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला.त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार डॉ.व्ही.एस.साधूण्णवर याना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.निवडणुकीच्या रिंगणात एकूण अठ्ठावन उमेदवार रिंगणात होते.सकाळी आठ वाजता ठळकवाडीतील आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला.त्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडून ईव्हीएम यंत्रे बाहेर काढण्यात आली.नंतर विधानसभा मतदारसंघनिहाय विभागणी करून मतमोजणी सुरु करण्यात आली.प्रारंभी पोस्टल मते मोजण्यात आली.पोस्टल मतात देखील अधिक मते सुरेश अंगडीना मिळाली.पहिल्या फेरीत भाजपचे सुरेश अंगडी यांनी आघाडी घेतली ती त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवली.

फेरीगणिक सुरेश अंगडी यांचे मताधिक्क्य वाढतच गेले.फेरीगणिक वाढत चाललेले मताधिक्य पाहून भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी अकरा वाजल्यापासून गुलालाची उधळण करून ढोल ताशांच्या निनादात फटाके फोडण्यास प्रारंभ केला.आमदार अभय पाटील यांनी तर स्वतः ढोल वाजवून जोरदार घोषणाबाजी करून आपला आनंद व्यक्त केला.मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पोलीस आयुक्त लोकेशकुमार हे स्वतः मतमोजणी केंद्रात ठाण मांडून होते.मतदान केंद्राच्या परिसरात आपली जागा सोडून इकडे तिकडे फिरणाऱ्या भाजप उमेदवाराच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.आर.विशाल यांनी धारेवर धरले.
दुपारी साडेतीनच्या सुमाराला भाजपचे उमेदवार सुरेश अंगडी मतमोजणी केंद्रात दाखल झाले.प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना भाजप उमेदवाराचे प्रतिनिधी देखील तेथे थांबले होते.यावेळी तेथे दाखल झालेल्या आर.विशाल यांनी या प्रतिनिधींना आपल्या जागी जाण्यास सांगितले आणि पाठवले.
मतमोजणी केंद्राकडे जाणारे सारे रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखून धरले होते.आरपीडी कॉर्नरवर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी करून जल्लोष केला.तेथे कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट घ्यावे लागत होते.

 

Angdi wins

काँग्रेसने राज्यातील सत्ता सोडावी-अंगडी यांनी केली मागणी

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बेळगाव लोकसभा मतदार संघात विजयाचा चौकार लगावलेले खासदार सुरेश अंगडी यांनी केली आहे.

गुरुवारी दुपारी लोकसभेची मतमोजणी झाल्यावर तब्बल तीन लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत निवडणून आल्यावर ते माध्यमांशी बोलत होते.ते म्हणाले की मी सर्व प्रथम जनतेचे आभार मानतो मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जे काही कार्य केलेलं आहे त्याची नोंद घेत जनतेने मला प्रचंड बहुमतांनी निवडून दिलेलं आहे.

गेल्या एक वर्षाच्या काळात कर्नाटकात काँग्रेसने जनतेसाठी काहीच केलेलं नाही ऐन दुष्काळाच्या काळात दुर्लक्ष करत जनतेने हा कौल नरेंद्र मोदींना दिला आहे.काँग्रेस पक्षाला महत्व देऊ नये कारण हा दखल घेणारा पक्ष नव्हे राज्यात नैतिक जबाबदारी काँग्रेसने राजीनामा द्यावा असेही ते म्हणाले.

बेळगाव लोकसभा मतदार संघात अंगडी हे तीन लाखांहून अधिक मतांच्या फरकानी निवडून आले आहेत.काँग्रेसचे व्ही एस साधूंनावर वगळता अन्य 56 उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले आहे.

एकूण 11 लाख 79 हजार पैकी 10 लाखांच्या झालेल्या मतमोजणीची आकडेवारी

Karnataka-Belgaum
Results
O.S.N. Candidate Party EVM Votes Postal Votes Total Votes % of Votes
1 ANGADI SURESH CHANNABASAPPA Bharatiya Janata Party 634933 0 634933 63.26
2 BADRODDIN KAMDOD Bahujan Samaj Party 4633 0 4633 0.46
3 Dr.SADHUNAVAR Indian National Congress 309140 0 309140 30.8
4 DILSHAD SIKANDAR TAHASHILDAR Republican Party of India (A) 3209 0 3209 0.32
5 MANJUNATH H RAJAPPANAVAR Uttama Prajaakeeya Party 1711 0 1711 0.17
6 ANIL BABAN HEGADE Independent 723 0 723 0.07
7 ASHUTOSH S KAMBALE Independent 1477 0 1477 0.15
8 ANAND RAMESH PATIL Independent 749 0 749 0.07
9 UDAY KUNDARGI Independent 545 0 545 0.05
10 UDAY TUKARAM NAIK Independent 651 0 651 0.06
11 ONKARSINGH BHATIA Independent 812 0 812 0.08
12 KALLAPPA KRUSHNA KOWADKAR Independent 815 0 815 0.08
13 KAVITA DEEPAK KOLE Independent 1192 0 1192 0.12
14 KRISHNAKANT KAMANNA BIRJE Independent 1978 0 1978 0.2
15 GAJANAN AMRUT TOKANEKAR Independent 1825 0 1825 0.18
16 GANESH M DADDIKAR Independent 6524 0 6524 0.65
17 GOPAL BALAWANTRAO DESAI Independent 1943 0 1943 0.19
18 CHETAKKUMAR YALLAPPA KAMBLE Independent 386 0 386 0.04
19 DHANANJAY RAJARAM PATIL Independent 755 0 755 0.08
20 NAGESH SUBHASH BOBATE Independent 619 0 619 0.06
21 NITEEN DHONDIBA ANANDACHE Independent 378 0 378 0.04
22 NILKANTH MAHADEV PATIL Independent 342 0 342 0.03
23 NANDA MARUTI KODACHWADKAR Independent 477 0 477 0.05
24 PRAKASH BALAPPA NESARKAR Independent 536 0 536 0.05
25 PRANAM PRAKASH PATIL Independent 321 0 321 0.03
26 PRABHAKAR BHUJANG PATIL Independent 424 0 424 0.04
27 PANDURANG MALLAPPA PATTAN Independent 503 0 503 0.05
28 BULAND DEEPAK DALVI Independent 490 0 490 0.05
29 MAHADEV MARUTI MANGANAKAR Independent 569 0 569 0.06
30 MARUTI SIDDAPPA CHOUGULE Independent 513 0 513 0.05
31 MEGHARAJ SHIVAGOUDAPPA KHANAGOUDAR Independent 557 0 557 0.06
32 RANJIT KALLAPPA PATIL Independent 1192 0 1192 0.12
33 RAJU CHANGAPPA DIVATAGI Independent 1749 0 1749 0.17
34 RAJENDRA YALLAPPA PATIL Independent 402 0 402 0.04
35 RAMCHANDRA KRISHNA GAONKAR Independent 708 0 708 0.07
36 RAMCHANDRA DATTOBA PATIL Independent 320 0 320 0.03
37 LAXMAN BHIMARAO DALAVI Independent 517 0 517 0.05
38 LAXMANRAO SOMANNA MELGE Independent 443 0 443 0.04
39 LAXMI SUNIL MUTAGEKAR Independent 479 0 479 0.05
40 VIJAY KRISHNA MADAR Independent 209 0 209 0.02
41 VIJAY LAXMAN PATIL Independent 374 0 374 0.04
42 VINAYAK GOPAL GUNJATKAR Independent 733 0 733 0.07
43 VINAYAK BALKRISHNA MORE Independent 3159 0 3159 0.31
44 VISHWANATH RAGHUNATH BUWAJI Independent 449 0 449 0.04
45 SHIVARAJ NARAYAN PATIL Independent 387 0 387 0.04
46 SHRIKANT BALKRISHNA KADAM Independent 495 0 495 0.05
47 SHUBHAM VIKRANT SHELKE Independent 601 0 601 0.06
48 SHANKAR PUNNAPPA CHAUGALE Independent 1641 0 1641 0.16
49 RATHOD SHANKAR PANDAPPA Independent 2830 0 2830 0.28
50 SACHIN MANOHAR NIKAM Independent 672 0 672 0.07
51 SACHIN SHANTARAM KELAVEKAR Independent 1323 0 1323 0.13
52 SUNIL GUDDAKAYU Independent 359 0 359 0.04
53 SUNIL VITTAL DASAR Independent 791 0 791 0.08
54 SURESH KHEMANA RAJUKAR Independent 242 0 242 0.02
55 SURESH BASAPPA MARALINGANNAVAR Independent 255 0 255 0.03
56 SANJAY SHIVAPPA KAMBLE Independent 392 0 392 0.04
57 SANDIP VASANTH LAD Independent 335 0 335 0.03
58 NOTA None of the Above 2902 0 2902 0.29
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.