हलगा मच्छे रिंग रोड प्रमाणे अलारवाड क्रॉस जवळ देखील जमीन संपादन करण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेत सांडपाणी प्रकल्पाची जमीन कब्जा करत कामाला सुरुवात करण्यात आली आहे.बुधवारी सकाळी अलारवाड क्रॉस जवळ अधिकाऱ्यांनी 19 एकर जमिनीवर कब्जा घेत कामाला सुरुवात केली.
कोणतीही नोटीस नसताना पोलिसी बळावर दडपशाही करत जमीन संपादन का करत आहात असा प्रश्न करत संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले मात्र आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेत कामाला सुरुवात झाली आहे.यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांत बराच संघर्ष होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जवळपास 200 हुन अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांनी जमीनी कब्जा देण्यास जोरदार विरोध केला पोलीस बळ वापरून शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या जवळपास 11 हुन अधिक शेतकऱ्यांना ए पी एम सी मध्ये स्थानबद्ध करण्यात आलं आहे.पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचे ठरले होते कोणीच शेतकऱ्यांनी अध्याप नुकसानभरपाई घेतली नाही कोणतीही नोटीस दिली गेली नाही असे असताना पोलीस बळाचा वापर करत या सुपीक जमिनीचे पजेशन घेण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते नारायण सावंत यांनी दिली आहे.
हलगा आणि अलारवाड येथील शेतकऱ्यांची रि सर्व्हे नंबर 56,57,आणि 58 मधील जवळपास 19 एकर 20 गुंठे शेत जमीन सांडपाणी प्रकल्प राबवण्यासाठी संपादन करण्यात येत आहे सदर सुपीक जमीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढा आंदोलन केली आहेत अखेर पोलीस दडपशाहीने जमिनीवर कब्जा करत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.