उचगाव येथील प्रगती लोहार या विद्यार्थिनीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. प्रगती उचगाव येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी असून उचगाव च्या स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, तिला 625 पैकी 588 (94.8%)गुण मिळाले असून उचगावं सेंटर मध्ये ती प्रथम आली आहे.
तिचे वडील लोहार काम करतात रोजंदारीच्या कामांवर जाऊन आई कुटुंब सांभाळते, राहायला योग्य घर नाही, अभ्यासाला जागा नाही अशा परिस्थितीत या विद्यार्थिनीने आपले शिक्षण पूर्ण केले.
घर बांधण्यासाठी सरकारी योजनेतून मदत मिळावी यासाठी या कुटुंबाने प्रयत्न केले मात्र त्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे कुठलेही क्लास नाही किंवा शिकवणी नाही अशा परिस्थितीत स्वतःच्या जीवावर अभ्यास करून तिथपर्यंत आली असून पुढील शिक्षण घेण्याची त्यांची परिस्थिती नाही. या विद्यार्थिनीला शिकण्याची इच्छा आहे पण शिक्षण घेणे अवघड आहे यासाठी समाजाने मदत करण्याची गरज आहे.
प्रगती लोहार या विद्यार्थिनीला शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत, स्वतंत्र अभ्यासाची सोय नाही, एका झोपडीवजा घरात राहताना तिने आपले शिक्षण पूर्ण शिक्षण केले आहे, त्या पुढील शिक्षणासाठी तिला मदतीची गरज आहे.