Friday, April 26, 2024

/

इम्पॅक्ट-पाणी पुरवठा खात्याला आली जाग

 belgaum

ऐन उन्हाळ्यात शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना गळती झाली असताना अनगोळ येथील लिकेज जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली आहे.गुरुवारी बेळगाव live ने पाणी गळतीची बातमी करताच चोवीस तासाच्या आत  पाणी पुरवठा खात्याला जाग आली असून जल वहिन्या दुरुस्त करण्यात आल्या आहे.

अनगोळ परिसरातील रामनाथ मंगल कार्यालयाच्या समोरील भागात पाणीपुरवठा करणाऱ्या लाईन ला लिकेज होऊन गेल्या 25 दिवसांपासून पाणी वाया जात होते. हे पाणी गटारीत मिसळून थेट वाया जात असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाच्या गलथान कारभाराबद्दल भागातील नागरिक संताप व्यक्त करत होते.

Drainage repair work
त्या संदर्भात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी मंजुनाथ आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना ही कल्पना दिली त्यानंतर अधिकाऱ्यांनी गळती दुरुस्त केली

 belgaum

बेळगाव शहर आणि परिसरात अनेक भागात या प्रकारे लिकेज होऊन पाणी वाया जाऊ लागले असून पाणीपुरवठा मंडळाचा गलथान कारभार समोर येत आहे मात्र अनगोळ  मधील गळती दुरुस्त झाल्याने या भागातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.