मातृदिनाचे औचित्य साधून माननीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बेळगाव जिल्हा इस्पितळाच्या प्रसूती विभागातील परिचरिकांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शहर प्रमुख रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रसूती विभागातील परिचारिकांच्या सेवेचे ऋण फेडण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे रवींद्र जाधव यावेळी बोलताना म्हणाले.
शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी, प्रसूती विभागात सेवा बजावणाऱ्या परिचारिकांच्या सेवाभावीवृत्तीचे कौतुक केले.
यावेळी शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन परिचरिकांचा सन्मान करण्यात आला. मुख्य परिचारिका राधा यांनी सत्काराला उत्तर देताना, सेवाभावी संघटनांनी केलेला हा सन्मान आम्हा परिचारिकांच्या प्रामाणिक सेवाकार्याची पोचपावती असल्याचे सांगून सत्काराबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला शिवसेना उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, शिवसैनिक महेश टंकसाळी, संघाचे स्वयंसेवक मोतीलालसा धोंगडी, भाजपचे मनिष मालवतकर, युवा मोर्चाचे सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, शिवराष्ट्र समितीचे गजानन गोवेकर, अशोक गंगधर, काँग्रेसचे नामदेव कांबळे, बीट ब्रेकर्स नृत्य संस्थेचे तुकाराम महेंद्रकर, युवराज हुलमनी, मंजुनाथ महिंद्रकर,अंकिता दंडीन्नवर, प्रियांका गच्ची, डी. एन. साके यांसह विविध संघ-संस्थांचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.