छत्रपती शिवाजी महाराज हे बेळगावातील प्रत्येक मराठी माणसाचे आराध्य दैवत आहेत हे काय नवीन सांगण्याची गरज नाही.सध्या शिव जयंतीचे वातावरण जोरात सुरू आहे अश्या परिस्थितीत शहराचा फेरफटका मारताना अनेक पुतळे दिसतात मात्र जमिनी पासून 85 फूट उंचीवर 13 फूट उंचीचा पुतळा देखील आकर्षण बनला आहे.
ताशीलदार गल्लीतील गौरांग गेंजी यांच्या घरावर बसवलेला हा पुतळा देखील अनेक शिव प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. लहानपणापासून चे स्वप्न प्रत्यक्षात आणत या तरुणाने रोज सकाळी उठल्यावर सूर्यदर्शन घेणाऱ्या नागरिकांना शिवदर्शन व्हावे अशी व्यवस्था केली आहे.
लहानपणापासूनच माझ्या आणि माझ्या मित्रांच्या हृदयात शिवराय आरूढ झाले होते.
गल्लीत शिवरायांचे किल्ले बनवीत आम्ही मोठे झालो. मराठ्यांच्या या महानायकाने समाजाच्या उद्धारासाठी बरेच काही केले आहे, हा आमच्यासाठी देवच आहे. या देवाचा पुतळा सर्वात उंच ठिकाणी असावा हे माझे स्वप्न होते,ते पूर्ण केले आहे अशी माहिती या तरुणाने बेळगाव live ला दिली आहे.
80 फूट उंचीवर 1000 किलो वजनाचा हा 12.5 फूट उंच पुतळा बसवण्यात आलाय. सध्या एवढा उंच पुतळा जगात एकमेव आहे असा त्याचा दावा आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवून शिवरायांच्या नावे विक्रम करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे.
मराठा साम्राज्य उभे करून मराठी माणसाला आणि देशातील प्रत्येकाला जगण्याचा हक्क मिळवून दिलेल्या या राजाला ही एक आदरांजलीच आहे.