लोकसभा निवडणुकीच्या निकालात चिकोडी मतदार संघात अण्णासाहेब जोल्ले यांनी काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी यांचा पराभव केला होता त्या निमित्ताने जोल्ले यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनर वर काँग्रेसचे संभावित बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांचा फोटो लावण्यात आला आहे.सदर बॅनर वरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा पहायला मिळत आहे.
निपाणी शहराच्या श्रीराम सेना संघटनेच्या वतीने निपाणीत हा बॅनर लावण्यात आला रमेश जारकीहोळी यांच्या सह नरेंद्र मोदी अमित शाह बी एस येडीयुरप्पा जोल्ले दांपत्य आणि बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेते यांच्या सह रमेश जारकीहोळी यांचाही फोटो लावण्यात आला आहेत.
रमेश जारकीहोळी यांनी चिकोडीत अण्णासाहेब जोल्ले तर बेळगावात मतदार संघात सुरेश अंगडी यांच्या साठी काम केले होते त्यामुळे श्रीराम सेनेने भाजपच्या नेत्यांत बॅनर वर जारकीहोळी यांना समाविष्ट केले आहे.आगामी काही दिवसात रमेश भाजपात प्रवेश करण्याची ही चिन्हे आहेत की काय अशीही चर्चा रंगू लागली आहे.
एकीकडे गोकाक विधानसभा मतदार संघात जवळपास 50 हजार हुन अधिक मतांचा लीड सुरेश अंगडी यांना मिळाला आहे त्यामुळे दोन्ही जागांवर रमेश यांनी भाजप साठी काम केलेले सिद्ध होत आहे.तर दुसरीकडे यमकनमर्डी मतदार संघातून काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी यांना सतीश जारकीहोळी भाजपला रोखत केवळ तीन हजार किरकोळ मतांचा लीड दिला होता.एकूणच लोकसभा निवडणुकीवर जारकीहोळी बंधूतीळ वादाची छाप होती असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.