जुन्या गोगटे सर्कल गार्डन जवळील झोपडपट्टीत वास्तव्यास रहाणाऱ्या त्या वृद्धेचा खून तिच्या जवळील 25 हजार रुपये लुटण्याच्या उद्देशाने करण्यास आला असून या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी तीन युवकांना अटक केली आहे.
राजू निंगप्पा पाटील वय 24 मूळ रा.खानापूर सध्या रेल्वे उड्डाण पूल बेळगाव, जुबेर पुतन खान वय 22 मूळचा इंदिरा नगर चिकोडी सध्या रेल्वे उड्डाणनपुल बेळगाव आणि ईरांना कळसनावर वय 23 मूळचा सुरेबान रामदुर्ग सध्या रेल्वे उड्डाण पूल बेळगाव अशी वृद्धेच्या खून प्रकरणी अटक केलेल्यांची नावे असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर युवक लूट करण्याच्या उद्देशाने 11 मे रोजी रात्री साडे बाराच्या दरम्यान झोपडपट्टीत घुसले होते त्यांनी सिमेंट च्या टाईल्स ने डोक्यावर वार करून खून केला होता.
अज्ञातानी गोगटे सर्कल जवळील जुन्या गोगटे गार्डन जवळील झोपडपट्टीत प्रवेश करून एका वृद्ध महिलेच सिमेंट च्या टाईल्स ने डोक्यावर वार करून विराघवा श्रीराम आकाश वय 85 मूळ निवासी रा. कोंडगोटूर ता. राजमन्द्री आंध्रप्रदेश या वृद्धेचा खून केला होता .11 मे रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशराम श्रीराम आकाश आणि त्याची आई विराघवा श्रीराम आकाश हे दोघेहीगोगटे सर्कल जवळील जुन्या गोगटे गार्डन जवळील झोपडपट्टीत वास्तव्यास रहातात.परशराम हा रस्त्यावर पडलेले रट्ट रद्दी आणि प्लास्टिक बाटल्या गोळा करण्याचे काम करतो.
रविवारी रात्री तो झोपडी बाहेर गेला असता वरील तिन्ही आरोपीनी लूटमार करण्याच्या उद्देशाने झोपडीत प्रवेश करून त्याची आई विराघवा च्या डोक्यात सिमेंटच्या टाईल्सने जोरदार हल्ला केला होता त्यात तिचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी कॅम्प पोलीस निरीक्षक चननकेशव टिंगरींकर यांनी तपासाची चक्रे फिरवत सदर युवकांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असता त्यांनी पोलीस तपासात खून केल्याचे कबुल केले आहे. पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार आणि उपायुक्त सीमा लाटकर यांनी कॅम्प पोलिसांनी केवळ दहा दिवसाच्या आत तपास पूर्ण केल्याने त्यांचे अभिनंदन केले आहे.