2019 ची लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजली असली तरी ही निवडणूक समितीच्या वतीने बसवलेले 45 आणि एकूण संख्या असलेले 57 उमेदवार यामुळे बऱ्याच चर्चेत राहिली.
या निवडणुकीत एकूण 57 पैकी 55 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली तर यातील 14 उमेदवारांना 500 हुन कमी मते पडली.
निवडणूक आयोगाच्या कायद्या अनुसार कोणत्याही उमेदवारांस एकूण पडलेल्या मतांपैकी 1/6 पेक्षा कमी मते पडल्यास त्याची अनामत रक्कम जप्त होते. निवडणुकीत उभे राहण्यासाठी अनामत रक्कम 25 हजार रु. सामान्य तर अनुसूचित जाती उमेदवारांना 12500 रु. एवढी आहे.
यावेळेस एकूण मतांची बेरीज केल्यास पडलेल्या मतांचा सहावा भाग(1/6) म्हणजे 199151 मते होय.यात फक्त भाजपचे सुरेश अंगडी आणि काँग्रेसचे डॉ व्ही एस साधूंनावर या दोघानीच आपलं डिपॉझिट परत मिळवलं आहे तर उर्वरित 55 उमेदवारांचे डिपॉझिट मात्र जप्त झाले आहे या शिवाय या 57 पैकी 14 उमेदवार असे आहेत की ज्यांना 500 पेक्षा कमी मते मिळाली आहेत.
नोटाची घसरली टक्केवारी
या निवडणुकीत नोटा मतांची टक्केवारी घसरली असून एकूण मतांपैकी 0.27%मत म्हणजे 3233 मते मिळाली आहेत. नोटाचा 8व्या स्थानावर आहे.मागील 2014 निवडणुकीत नोटाला 1.07%म्हणजे मते मिळाली होती त्यात बेळगाव दक्षिण 1.43%तर रामदुर्ग मध्ये 1.3%मते मिळाली होती.