बेळगाव शहरात आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आणि मराठी भाषिक संघटनेचे कार्यकर्ते असून सुद्धा आम्हाला शिवरायांच्या मिरवणुकीत डी जे बंद करता येत नाही. अशी परिस्थिती असून याबद्दल फेसबुक आणि व्हाट्सअप्प वर पोस्ट घातल्या जात आहेत. पारंपारिक वाद्यांच्या मदतीने शिवजयंती साजरी व्हावी अशीच अपेक्षा आहे.
शहाजादे, इराणी व पठाण सरदार तसेच जसवंतसिंह राठोडसारखे राजपूत राजे या सर्वांनी छत्रपती शिवरायापुढे हात टेकले होते. वैयक्तिक शौर्य, संघटक व नायक म्हणून शिवाजीराजे अग्रगण्य ठरले होते. अफजलखानाशी केलेले युद्ध, शाहीस्तेखानावर छापा, सुरतेची लूट, एवढेच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी केलेला बिनधास्त प्रवेश या सर्व गोष्टी वरील विधानांची व गुणांची प्रचिती देतात.
File photo( मागील वर्षीच्या शिवजयंती मिरवणुकीत शारीरिक कसरत करतांना हा फोटो आहे)
जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्वितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजीमहाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. स्वराज्याचेच नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रुपांतर होऊन हिंदुपादशाही असे नाव त्यास प्राप्त झाले. भारतातील सर्वांत शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जात होते.
बेळगावातील शिव जयंतीनिमित्त होणारी मिरवणूक तर ऐतिहासिक होते अवघे शिवचरित्र हालत्या देखाव्यातुन रस्त्यावर पहायला मिळते महाराष्ट्र असो किंवा जग अशी शिवजयंती मिरवणूक कुठेच साजरी होत नाही शिव जन्मा पासून ते राज्याभिषेक चे सर्व शिवरायांच्या जीवनातील देखावे पहायला मिळतात त्यात लेझीम ढोल पथक लाठी शारीरिक कसरतीचे खेळ मिरवणुकीत दाखवले जातात असे असताना डॉल्बी लावून नृत्य करणे चुकीचे आहे जाणकारांचे म्हणणे आहे.
File photo( मागील वर्षीच्या शिवजयंती मिरवणुकीत शारीरिक हालता देखाव्याचा हा फोटो आहे)
बेळगावातील शिव जयंतीनिमित्त होणारी मिरवणूक तर ऐतिहासिक होते अवघे शिवचरित्र हालत्या देखाव्यातुन रस्त्यावर पहायला मिळते महाराष्ट्र असो किंवा जग अशी शिवजयंती मिरवणूक कुठेच साजरी होत नाही शिव जन्मा पासून ते राज्याभिषेक चे सर्व शिवरायांच्या जीवनातील देखावे पहायला मिळतात त्यात लेझीम ढोल पथक लाठी शारीरिक कसरतीचे खेळ मिरवणुकीत दाखवले जातात असे असताना डॉल्बी लावून नृत्य करणे चुकीचे आहे जाणकारांचे म्हणणे आहे.
आम्ही मात्र इतिहासातील सोनेरी पाने नव्या पिढीला दाखवायचेच सोडून डी जे व डॉल्बी दाखवत आहोत.एक चित्ररथावरील महाराजांची मूर्ती ठेवून हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या समोर डी जे लावून मिरवणुकीत अडथळे निर्माण करत आहेत ,
बेळगाव शहरात आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आणि मराठी भाषिक संघटनेचे कार्यकर्ते असून सुद्धा आम्हाला शिवरायांच्या मिरवणुकीत डी जे बंद करता येत नाही.असे पोस्ट पसरत असून याचा नक्कीच विचार व्हावा….बेळगावच्या शिवजयंती मिरवणुकीला ऐतिहासिक वारसा आहे आज 100 वर्षे पूर्ण होताहेत अश्या वेळी सर्वांनी ही वैभवी परंपरा टिकवणे गरजेचे आहे.