बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड ने नवीन स्मार्ट रोड साठी निविदा काढल्या आहेत. पेव्हर्स ब्लॉक चा वापर करून शांती नगर, विनायक कॉलनी, मराठा कॉलनी, शास्त्री नगर, कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड क्र 5 आणि हुलबत्ते कॉलनी येथे हे रोड केले जाणार आहेत.
याचबरोबरीने फुटपाथ व सायकल ट्रॅक ची निर्मितीही केली जाईल. चौथ्या रेल्वे गेट पासून बेंको पर्यंत हे काम होणार असून त्यासाठी :4,96,18,876.76 (4.96 कोटी) इतका खर्च अपेक्षित आहे.
पेव्हर्स ब्लॉक ने स्मार्ट रोड बनविण्यासाठी रस्त्यानुसार अपेक्षित खर्च खालीलप्रमाणे आहे.1. शांतिनगर :8,32,21,148.14 (8.32 कोटी)
2.टिळकवाडी येथील विवेकानंद आणि मराठा कॉलनी: 8,91,92,504.75 (8.91 कोटी)
3.शास्त्रीनगर, कपिलेश्वर कॉलनी व महाद्वार रोड क्र 5 : 7,82,28,201.13 (7.82 कोटी)
4. वडगाव रोड ते महावीर भवन:10,70,43,468.98 (10.7 कोटी)
काही रस्ते सफेद टॅपिंग करून स्मार्ट बनविले जाणार आहेत ते खालीलप्रमाणे
1. मिलन हॉटेल ते क्लब रोड गांधी पुतळा व्हाया हर्षा शोरूम : 14,40,10,080.75 (14.4 कोटी)
2. अनगोळ रोड ( बिगबाझार ते मेडिकल शॉप) : 10,05,68,782.56 (10 कोटी)