भारतीय लष्करात धाडसी तरुणांसाठी करिअरच्या उत्कृष्ठ संधी उपलब्ध आहेत.लष्करात दाखल होऊन एक चांगला नागरिक बनण्या बरोबरच देशसेवा करण्याची देखील संधी मिळते. सेवा,त्याग ,देशभक्ती आणि देशाच्या विविधतेच्या संस्कृतीची देखील माहिती मिळते.
लष्करात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेन्टरतर्फे शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे.लष्करात दाखल होण्यासाठी उपलब्ध असलेले वेगवेगळे पर्याय,वेतन ,दिल्या जाणाऱ्या सवलती यांची माहिती देण्यात येत आहे.अनेक शाळा ,कॉलेजमध्ये मराठा सेंटरचे ब्रिगेडियर गोविंद कलवड आणि अधिकाऱ्यांनी भेट देवून विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
बेळगाव सह इतर जिल्ह्यातील शाळा कॉलेजना भारतीय सैन्य भरती बद्दल विद्यार्थ्याना माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करायचे असल्यास मराठा सेंटर Maratha Light Infantry Regimental Centre (Ph No -08884458271)संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.