म्हादाई ट्रिब्युनलने गोव्याच्या याचिकेवरील सुनावणी नाकारली आहे, याच विषयावर गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात न्याय मागितला असून पुन्हा ट्रिब्युनल कडे दाद मागता येत नाही , सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्यानंतर या याचिकेचे भवितव्य ठरेल असा युक्तिवाद कर्नाटक सरकारने केल्यावरून ही सुनावणी रद्द करण्यात आली आहे.
जे एम पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या तीन सदस्यीय ट्रिब्युनलने गुरुवारी हा निर्णय घेतला. कर्नाटक सरकार म्हादाई नदीच्या कळसा कालव्यातून मलप्रभा नदीला पाणी जोडत आहे पण यात पर्यावरणीय तसेच वन्यजीव कायद्याच्या नियमांचा विचार केलेला नाही, याविषयावर ही विशेष याचिका गोवा सरकारने घातली आहे.
यावर कर्नाटकाच्या वकिलांनी युक्तिवाद केला, अशीच याचिका सर्वोच्च न्यायालयासमोरही गोव्याने दाखल केली असल्याने व त्यावर अजून सुनावणी झालेली नसल्याने जोपर्यंत वरिष्ठ न्यायालय निकाल देत नाही तोवर ट्रिब्युनलने सुनावणी करू नये अशी विनंती करण्यात आली आहे.ट्रिब्युनलने ही विनंती मान्य केली आहे.