सैराट फेम आर्ची अर्थात एका रात्रीत नावा रुपाला आलेली मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली ही बातमी जुनी झाली आहे. पण त्यापेक्षा अधिक ताजी आणि ब्रेकिंग बातमी या आर्चीने बेळगाव live ला दिली आहे. आर्चीने बेळगावात बेळगावच्या सांबरा विमानतळावर झालेल्या चित्रीकरणात आज भाग घेतला आहे.
तिच्या एक नजरेने घायाळ होणाऱ्या तिच्या चाहत्यांना तिने सेल्फी देऊन खुश केले आहे.
गणेश पंडित दिग्दर्शित मेक अप या आगामी भव्य चित्रपटाच्या शेवटच्या भागाच्या चित्रीकरणासाठी आज या चित्रपटाची 60 जणांची टीम बेळगावला आलेली होती. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री रिंकू तथा आर्चीचाही या टीम चा समावेश होता. या चित्रपटाच्या क्लायमॅक्स चे चित्रीकरण बेळगाव विमानतळावर झाले.
टर्मिनल बिल्डिंग मध्ये हे शूटिंग झाले आणि आर्ची विमानतळावर विमानाने न येता बस ने येऊन बस ने निघून गेली.
ती येताना काहीच कळले नाही, कुणालाच पत्ता लागला नाही, पण जाताना हे कळल्याने सांबरा परिसरातील नागरिक आणि विमानतळावर सेवा देणाऱ्या टॅक्सी ड्रायवर नी गर्दी केली होती. त्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्रीकडे सेल्फी चा आग्रह धरला पण मराठीत सांगितलं तर कळतंय की इंग्रजीत सांगू? असे म्हणत नकार न देता आर्चीने आपल्या चाहत्यांना खुश केले.
महाराष्ट्रातील विविध भागात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे, मराठमोळ्या बेळगावात झालेले अखेरच्या भागाचे चित्रीकरण बेळगाव साठी मोठेच आहे, आता आर्चिला प्रत्यक्ष बघता न आलेले तिचे चाहते हा चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा याची आतुरतेने वाट पाहणार आहेत.