बेळगावचे सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेल्या टिळकवाडी येथील कलामंदिराची जुनी वास्तू पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच कलामंदिर नवीन रुपात भेटीला येणार आहे.
या ठिकाणी बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने प्रशस्त भव्य मॉल बांधण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचा नियोजित मॉल प्रकल्प कागदावरच राहिला होता. नागरिकांतून झालेल्या जोरदार टीकेनंतर महापालिकेने कलामंदिर च्या जागेत मॉल बांधण्याच्या कामाचा आराखडा बनविला आहे. त्यानुसार कला मंदिराची जुनी वास्तू पाडून त्याजागी मॉल उभारण्यात येणार आहे.
(File फोटो :प्रस्तावित कला मंदिर कमर्शियल कॉम्प्लेक्स चा प्लॅन)
सुसज्ज प्रेक्षागृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि इतर अनेक सोयीची भर या ठिकाणी पडणार आहे. जुने कलामंदिर आता स्मार्ट होणार आहे. जुनी इमारत जमीनदोस्त होत असल्याने जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार
१.१५ एकर जागा मोकळी होईल यावर ४३.५ कोटी निधी खर्च केला जाईल या कामाची निविदा काढली जात आहे.
२०१४ मध्ये मनपाच्या आणि नागरी भागीदारीतून हे कलामंदिर बांधण्याचे प्रस्ताव पुढे आले होते. खासगी गुंतवणूकदार घेण्याचा तसेच सरकारी कर्ज घेण्याचाही विचार करण्यात आला. पण पुढे काहीच झाले नाही.
पण आता स्मार्ट सिटी योजनेतून हा उपक्रम पूर्ण होईल. याठिकाणी विभागीय स्थरावरील नागरी सुविधा पुरवल्या जातील.
असा आराखडा
एकूण जागा: ७८०० चौ मिटर
मजले: G+३
सोयी:
१. मल्टि लेवल पार्किंग
२. मल्टी मोडल पार्किंग स्टँड
३.मल्टिप्लेक्स व शॉपिंग मॉल
४.मिनी सभागृह
५. इतर अनेक सुविधा येणार.