अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करत जिद्द आणि हुषारीच्या जोरावर उचगाव येथील प्रगती लोहार या विद्यार्थिनीने एस एस एल सी परीक्षेत 94.8%गुण मिळवत यश मिळवले आहे तिची यशोगाथा बेळगाव live ने मांडली होती.
गरीब परिस्थितीत तिला पुढील शिक्षणासाठी मदतीची गरज आहे अशी भावना बेळगाव live ने व्यक्त केल्या नंतर तिला हळूहळू मदत मिळू लागली आहे.बेळगाव live च्या आवाहनाला प्रतिसाद देत अनंतशयन गल्ली येथील गणेश ट्रेडर्सचे मालक संतोष यांनी पुढील शिक्षणासाठी दहा हजारांची आर्थिक मदत देऊ केली आहे. या शिवाय गणेश ट्रेडर्स मधून यावर्षीची कॉलेज पाच ड्रेस देण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी कल्लेहोळ ग्राम पंचायतीचे अध्यक्ष संजय पाटील,लक्ष्मण चौगुले आदी उपस्थित होते.
शनिवारी सकाळी उचगाव प्रत्यक्ष घरी जाऊन संतोष यांनी प्रगती हिला दहा हजारांची रक्कम मदत म्हणून दिली आहे.प्रगती उचगाव येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी असून उचगाव च्या स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तिला 625 पैकी 588 गुण मिळाले असून उचगावं सेंटर मध्ये ती प्रथम आली आहे.तिचे वडील लोहार काम करतात रोजंदारीच्या कामांवर जाऊन आई कुटुंब सांभाळते, राहायला योग्य घर नाही, अभ्यासाला जागा नाही अशा परिस्थितीत या विद्यार्थिनीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
ग्राम पंचायटीकडे घर बांधण्यासाठी सरकारी योजनेतून मदत मिळावी यासाठी या कुटुंबाने प्रयत्न केले मात्र त्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे कुठलेही क्लास नाही किंवा शिकवणी नाही अशा परिस्थितीत स्वतःच्या जीवावर अभ्यास करून तिथपर्यंत आली असून पुढील शिक्षण घेण्याची त्यांची परिस्थिती नाही.
या विद्यार्थिनीला शिकण्याची इच्छा आहे पण शिक्षण घेणे अवघड आहे यासाठी समाजाने अजूनही मदत करण्याची गरज आहे.स्वतंत्र अभ्यासाची सोय नाही, एका झोपडीवजा घरात राहताना तिने आपले शिक्षण पूर्ण शिक्षण केले आहे, त्या पुढील शिक्षणासाठी तिला मदतीची गरज असून इच्छुकांनी 9448340028(संजय पाटील )संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.