केंद्र सरकार म्हणतय की हा देश शेतीप्रधान आहे पण हे फक्त नावालाच आहे याचे चित्र सध्या बेळगाव आणि परिसरात दिसत आहे. बेळगाव मच्छे बायपास आणि रिंगरोड च्या निमित्ताने हे चित्र समोर आले आहे.
आजही शेतकऱ्यांनी या अतिक्रमित रस्त्यांचे काम शेती बचाव समितीने बंद पाडवले आहे. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही अचानक येऊन रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला आहे.
दोन दिवसांपूर्वी पासून शेतकऱ्यांची ही भूमिका कायम आहे, यापूर्वीही शेतकऱ्यांनी या कामाला विरोध केला आहे. पिकावू जमिनीला हात लावू नका अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
रिंगरोड किंव्हा बायपास हे दोन्हीही शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, पिकावू जमीन यात जाणार आहे त्यामुळे शेतकरी भडकले आहेत.
हलगा मच्छे बायपासला विरोध करत शेतकऱ्यांनी मजगावं शिवारात काम बंद पाडले.बायपास करण्यासाठी JCB, Roller, Trucks ह्याना शिवारातुन परत पाठविण्यात आले.
शेतकऱ्यांनी काम बंद केलं असलं तरी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्या गुरुवारी पुन्हा शेतकरी काम बंद पाडण्यासाठी आंदोलन करणार आहेत अशी शेती बचाव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
सध्या अतिक्रमण नसलेल्या जमिनी सोडून ज्यांना अध्याप नोटीस दिली नसलेल्या जमिनी देखील संपादित केला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.