Saturday, November 16, 2024

/

कुशल संघटक माजी आमदार संभाजी पाटील

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेचे चार वेळा महापौरपद भूषवलेले बेळगाव दक्षिण मतदार संघाचे माजी आमदार संभाजीराव पाटील यांचे दिनांक 17 मे रोजी निधन झाले. मे अठरा रोजी दुपारी शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Benke

राजकारणात येण्याची अजिबात नसलेले संभाजीराव काहींनी त्यांच्यावर आग्रह केल्यामुळे राजकारणात आले आणि राजकारण समजून घेतले तर महानगरपालिका राजकारणावर त्यांनी ताबा मिळवला. आमदार झाल्यावरही त्यांनी महानगरपालिका नगरसेवक पदाचा राजीनामा दिला नाही पण महानगरपालिकेचे राजकारणाची सूत्रे त्यांनी आपल्या हातात शेवटपर्यंत कायम ठेवली होती.

Kiran jadhv

आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते सतत संपर्कात असत, सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यावेळी जातीयवादी शक्तींचा मग त्या कोणत्याही जातीच्या असो त्यांना त्यांनी कडाडून विरोधच केला प्रसंगी त्यांच्याशी दोन हात केले.

Mandolkar

मराठी अभिमानी असले तरी इतर भाषांचा त्यांनी आदरच केला कन्नड उर्दू हिंदी इंग्रजी भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या. औपचारिक शिक्षण त्यांना फारसे लाभले नाही पण त्यांचे काही अडले नाही. शक्य होईल ते आपण करावे ते जमत नाही तर दुसऱ्या कडूनच शिकून घ्यावे आणि दुसऱ्यांकडुन करून घ्यावे ही त्यांची कार्यपद्धती राहिली.महानगरपालिका विषयक कायदे त्यांनी चांगल्या तऱ्हेने आत्मसात केले होते, त्यामुळे सरकार दरबारी त्यांचे काम दिसून येत होते.

Mohan

ते कुशल संघटक होते आपल्या कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे काम त्यांनी केले आहे. सीमाप्रश्नी त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे, तत्कालीन महापौर विजयालक्ष्मी चोपडे यांना बरोबर घेऊन त्यांनी दिल्ली येथे सत्याग्रह केला त्यावेळी केंद्रिय गृहमंत्रीनी याची नोंद घेतली, त्यानंतर झालेल्या अनेक चळवळीत ते सहभागी झाले होते.

Sagar p

उमेदवार म्हणून बेळगाव दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भाजप उमेदवाराचा त्यांनी दणदणीत पराभव केला त्यानंतर कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी आपले सहकारी खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांच्या सोबतीने जोरदार आवाज उठवला, त्यांच्या आठवणी कायम राहणार आहेत.

Vaaz

माजी महापौर आणि आमदार संभाजी पाटील यांना श्रद्धांजली द्यायची असल्यास बेळगाव live शी ( फोन :9590229030) संपर्क करा.तुमची श्रद्धांजली ऐकतील रोज सरासरी 15 लाख व्यक्ती.

Reshami

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.