टिळकवाडी भागात असलेले दिवसभरात वारंवार बंद होत तीन रेल्वे गेट,सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे त्यात मतमोजणी ची गर्दी लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने रहदारी मार्गात बदल आणि डायवर्शन केले आहेत.केवळ एका दिवसांसाठी रहदारी मार्गात बदल करण्यात आला असून जनतेने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे
मतमोजणी रोजी या भागात वाहने पार्किंग करू नये
गोवा वेस बसवेश्वर सर्कल पासून बिग बाजार खानापूर रोड पर्यंत
गोगटे सर्कल पासून पूर्ण काँग्रेस रोड तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंत
आर पी डी सर्कल पासून सोमवार पेठ सर्कल पूर्ण देशमुख रोड
असे असेल रहदारी मार्गातील बदल
गोवा वेस कडून आर पी डी कडे जाण्यास सर्व वाहनांना एका दिवसा साठी निषेध केला असून सर्व वाहनांनी महावीर भवन हिंदवाडी, गुरुदेव रानडे मंदिर भगत सिंह मार्ग वडगांव कडून ग्रामीण भागात जावे तर गोमटेश कडून भाग्य नगर अनगोळ खानापूर रोड हरी मंदिर किंवा तिसऱ्या गेट कडे यावेत.
तिसऱ्या गेट कडून गोवा वेस कडे येणाऱ्या सर्व वाहनांनी बिग बाजार कडून डावीकडे दुसऱ्या रेल्वे फाटका कडून काँग्रेस रोडचा वापर करावा.
शहापूर कडून बेळगाव शहरा कडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी महात्मा फुले रोड,कपिलेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाचा वापर करून शहरात जावे
गुरुवारी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.