कॅटोंमेंट भाजी मार्केट ए पी एम सी मार्केटला स्थलांतरित केल्याने तणाव घेतल्याने एका दलालाचा मृत्यू झाला आहे. सिकंदर आसंगी वय 65 रा. सदाशिवनगर बेळगाव असे या दलालाचे नाव आहे. या स्थलांतरात अनेकांना रोजगार व दुकाने गमावली आहेत.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार भाजी मार्केट कॅटोंमेंट मधून ए पी एम सीत स्थलांतरित झाल्याने ते अत्यवस्थ होते ,प्रचंड तणावाखाली होते.शनिवारी मध्यरात्री या दलालाचा मृत्यू झाला आहे.जुन्या कॅटोंमेंट भाजी मार्केट मध्ये दुकान नंबर 75 मध्ये ते होलसेल भाजी विक्री करत होते त्यांचे स्वतःचे दुकान होते ते जुने व्यापारी असून कित्येक वर्षा पासून मार्केट मध्ये व्यापार करत होते.
ए पी एम सी सर्व व्यापाऱ्याना अजुनही दुकाने मिळाली नाहीत याचा घोळ कायम आहे.नवीन ए पी एम सी मार्केट मध्ये सिकंदर यांना देखील गाळा मिळाला नव्हता.शुक्रवारी सायंकाळी ते ए पी एम मार्केट मध्ये आले होते आमच्या पोटावर मार आली पुढे काय होणार म्हणून टेन्शन घेऊन रडत होते ते अत्यवस्थ होते, त्या टेन्शन मध्येच ते दगावले आहेत अशी माहिती कॅटोंमेंट व्यापाऱ्यांनी दिली आहे.
ए पी एम सी अधिकारी व जिल्हा प्रशासनाने या विषयावर लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढावा अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.