बेळगावच्या नेहरूनगरला एक बिहारी राहतोय, गेली 15 वर्षे तो तेथे आपल्या व्यवसायाच्या निमित्त स्थायिक आहे .कुमार साहनी असे त्याचे नाव, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने आपल्या कृतीतून आपली शिवभक्ती, भगवान शंकर भक्ती नव्हे तर शिवाजी महाराज भक्ती दाखवून दिली आहे.
तो रोज आपल्या देवाऱ्यात शिवाजी महाराज्यांना पूजत आहे.सगळे जण देवाऱ्यात देवपूजा करतात विशेष करून आपल्या कुळदेवतेला पूजतात, पण हा बिहारी शिवभक्त रोज सकाळी कुलदेवते बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करतोय.मागील दोन वर्षापासून त्याने ही पद्धत सुरू केली आहे.
शिवरायांच्या पुतळ्याला मूर्ती म्हणा अशी मागणी करून आपली श्रद्धा दाखवणाऱ्या तरुणांपेक्षा हा शिवभक्त शिवरायांना आपल्या देव्हाऱ्यात समाविष्ट करून त्यांना देवत्व देऊन आपली श्रद्धा दाखवत आहे, रोज षोडशोपचाराने होणारी शिव पूजा पाहण्यासारखी असते.
कुमार हा मूळचा पैंताली जिल्हा पाटण्या जवळचा असून गेल्या 15 वर्षा पासून नेहरू नगर येथे खोलीत वास्तव्यास आहेत.के एल ई इस्पितळात मेस मध्ये स्वयंपाकी काम करतो.
त्याचा लहान पुतण्याही शिवभक्त आहे, या पुतण्याने एक किल्ला करून त्यात सिंहासनारूढ मूर्ती किल्ल्यात लावला होता,त्यातील मूर्ती या काकाने आपल्या देवाऱ्यात ठेवली आहे.
बेळगावच्या वातावरणात कोणीही आला की तो शिवभक्त होतोच याचे हे एक उदाहरण आहे. त्या बिहारी व्यक्तीचा आदर्श आम्ही सगळ्यांनी घेण्यासारखा आहे.