15 रोजी बेळगावातून दोन नवीन विमान सेवा सुरू होणार आहेत या अगोदर स्टार एअरने 15 मे पासून बेळगाव अहमदाबाद सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे त्या नंतर आता त्याच दिवशी म्हणजे 15 मे रोजी पासूनच अलायन्स एअरवेज बेळगाव पुणे नवीन विमान सेवा सुरू करणार आहे.
अलायन्स एअर ही कंपनी एअर इंडियाची प्रादेशिक प्रवासी विमान कम्पनी आहे सदर कम्पनी बंगळुरु बेळगाव पुणे अशी विमान सेवा आठवड्यातुन सहा दिवस सुरू करणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली आहे.
बेळगाव पुणे ही विमान सेवा केंद्र सरकारच्या उडान योजने अंतर्गत सुरू करणार असल्याचे देखील अलायन्स ने म्हटले आहे.
बंगळुरु बेळगाव पुणे ही विमान सेवा 72 सीट क्षमता असलेल्या ए टी आर विमानाने होणार आहे. विमान क्रमांक 9I-513 हे दुपारी 2:15 वाजता बंगळुरु हुन बेळगावकडे प्रयाण करणार असून दुपारी 3:40 मिनिटांनी बेळगावला पोहोचेल तर सायंकाळी 4:05 मिनिटांनी पुण्याकडे प्रस्थान करणार आहेब 5:20 वाजता पुणे येथे पोहोचणार आहे.
विमान क्रमांक 9I-514 हे विमान पुणेहुन
सायंकाळी 5:45 वाजता बेळगावकडे निघणार असून सायंकाळी 7:05 ला बेळगावला पोहोचेल बेळगावातून 7:30 वाजता सुटून रात्री 9:30 वा. बंगळुरुत पोचणार आहे. आठवड्यात मंगळवारी सोडून दररोज ही विमान सेवा सुरू असल्याची महिती देखील अलायन्स ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.