बेळगाव शहर गुन्हा अन्वेषण पोलिसांनी दुचाकी वाहने पळवणाऱ्या त्रिकुटास गजाआड करत त्यांच्या जवळील जवळपास दहा लाख किंमतीची दहा वाहने जप्त केली आहेत.
अनिल बागडी वय 19 रा.शांतीनगर चिंचवाड कोल्हापूर,मोहन बागडी वय 20. रा.झोपडपट्टी सागर नगर कणबर्गी बेळगाव तरअल्ताफ अलवाड वय 24 रा. जनता प्लॉट कणबर्गी अशी या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.
मुखबिरांनी दिलेल्या माहिती वरून आर टी ओ जवळ संशयित चोरटे चोरलेल्या वाहनांची विक्री करायला आले असता संशयास्पद रित्या फिरताना या तिघांना अटक करून त्यांची चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले आहे.
पाच रॉयल इनफिल्ड बुलेट,तीन यामाहा एक स्पेलंडर आणि एक पॅशन प्रो अश्या 9 लाख 85 हजार किंमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.शहर गुन्हे अन्वेषण शाखेचे ए सी पी महंतेश्वर राव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी चोरट्यांना गजाआड केलेल्या टीमचे कौतुक केले आहे.




