Friday, December 20, 2024

/

बेळगावचे कॅन्टोन्मेंट बोर्डही बनतेय स्मार्ट

 belgaum

बेळगावचे कॅन्टोन्मेंट बोर्डही स्मार्ट बनत आहे. सीईओ दिव्या शिवराम यांच्या प्रयत्नातून बनविण्यात आलेल्या कॅन्ट ऍप मुळे यंत्रणा स्मार्ट होणार आहे. सीईओ आणि सदस्य साजिद शेख यांनी प्रयत्न करून राज्य सरकारकडे अडकून पडलेले 78 लाखांचे एसएफसी ग्रांट मिळवून आणले आहे. आणि बोर्डाच्या सर्व भाड्याने दिलेल्या गाळ्यांचा नव्याने लिलाव होऊन बोर्डाचा महसूल वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानक कार्पोरेट होणार आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाची बैठक आज झाली. या बैठकीत लिलावाचा महत्वाच्या निर्णयावर ठराव करण्यात आला आहे.

Cant meeting

आता सर्व शॉप्स चा लिलाव होणार आहे, बोर्डाचे एकूण 45 शॉप्स आहेत, त्यांचे लिझ संपले असून त्यांचा लिलाव करून नवीन पद्धतीने शॉप्स भाड्याने देण्यात यावेत अशी सूचना आली आहे
यामुळे बोर्डाला महसूल मिळणार आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे चालविण्यात येत असलेल्या सीबीएससी अभ्यासक्रम असलेल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आजपर्यंत कसलेच शुल्क घेण्यात येत नाही. यापुढे नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांकडून वार्षिक 1000 रुपये शुल्क घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

सीईओ दिव्या शिवराम यांनी आपली कल्पकता वापरून एक कॅन्ट ऍप विकसित केले आहे. नागरिकांना आपली सर्व कामे आणि समस्या या ऍप वर सोडविता येणार आहेत. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. याबद्दल त्यांचे कौतुकही झाले.
बोर्डाला द्यावयाचे एस एफ सी ग्रांट राज्य सरकारने दिले नव्हते . माजी उपाध्यक्ष व सदस्य साजिद शेख व सीईओ यांच्या प्रयत्नातून मिळवण्यात आले आहे, याबद्दलही कौतुक झाले .
स्मार्ट सिटीतून रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानक कॉर्पोरेट होणार आहे. विकास झाल्यावर 1 एकर 37 गुंठा जागेत मिळणार 70 टक्के महसूल कॅन्टोन्मेंट बोर्डाला मिळणार आहे. असाही निर्णय घेण्यात आला.
अध्यक्ष ब्रिगेडियर गोविंद कालवड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. नूतन उपाध्यक्ष
अरेबिया धारवाडकर यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. बैठकीला सर्व सदस्य, ऍडम ऑफिसर विजय भट तसेच जी पी जोल्लद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.