बेळगाव विमानतळावर नवीन विमानसेवा सुरू होणार अशी बातमी येण्यापेक्षा असलेली एअरबस सेवा बंद होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. बेळगाव विमानतळावर उपलब्ध असलेली बेळगाव ते बेंगलोर या मार्गावरील इंडियन एअरबस आता बंद होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
ही एअर बस बंद करण्याचा निर्णय घेऊन बेळगावच्या नागरिकांना इंडियन एअर लाईन्सने आणखी एक धक्का दिला आहे. अन्यायाचा सामना कराव्या लागणाऱ्या आणि सुविधाबाबत दुर्लक्षित असणाऱ्या बेळगाव विमानतळाच्या बाबतीत धक्कादायक माहिती मिळालीअसून एक जून पासून ही विमानसेवा बंद होणार आहे.
हुबळी ते बंगळूर मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीही बेळगाव येथून सर्व सुविधा हुबळी विमानतळावर हलवण्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे. एअर बस विमान सेवा सर्व प्रकारच्या कृषी आणि औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरते पण तीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे बेळगाव येथून 95 टक्के प्रतिसाद देऊन सुद्धा विमान कंपन्या बेळगाव पेक्षा हुबळी विमानतळालाच झुकते माप देत असल्याचे स्पष्ट होत आहे.