हलगा मच्छे बायपास रोड जमीन संपादन प्रकरणी आंदोलन करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलं आहे.गेल्या महिनाभर पासून जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांचा विरोध झुगारत दडपशाहीने जमीन संपादन करत आहे.
या जमीन संपादन प्रक्रियेवेळी अनेक अल्पभूधारक शेतकरी सुपीक जमीन बळकावू नका म्हणून टाहो फोडत आहेत आंदोलन करत आहेत अश्यावेळी पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत अश्या अनेक घटना हलगा मच्छे बायपास रोड जमीन संपादन वेळी घडत आहेत.
अलारवाड येथे संतप्त शेतकरी बुलडोझर खाली येऊन झोपुन आंदोलन केल्याची घटना ताजी असताना धामणे रोड वडगांव शिवारात रयत गल्लीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी देखील शेतात आंदोलन केलं आहे यादरम्यान आपली जमीन वाचवण्यासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.रयत गल्ली येथील भुवनेश बिरजे आणि नीलम बिरजे असे या ताब्यात घेतलेल्या दम्पतीचे नाव आहे.या रस्त्यात 15 गुंठे ऐवजी असलेली सगळी दोन एकर जमीन संपादन होत असल्याने संतप्त दम्पतीने आंदोलन छेडून शेती वाचवण्याचा प्रयत्न केला.आपल्या शेतातील 2 एकर जमिनीत ऊस शेती पीक असताना कारवाई होत असल्याचा दुःखा पोटी आंदोलन केले असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर भू संपादन 2009 ,2011 की 2018 च्या कोणत्या गॅजेटनुसार करत आहेत हेच कळत नसून तोंड पाहून शेती संपादन करत आहेत असा आरोप करत आहेत.यावेळी एकूण पाच जणांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यात भुवनेश बिरजे नीलम बिरजे,तानाजी हलगेकर प्रकाश नाईक आणि कंग्राळकर आदींचा समावेश आहे.