आज काल च्या युगात सगळे व्ही आय पी.राजकारणी आपापल्या थाटात माटात वागत असतात आपापल्या कामात व्यस्त असतात मात्र बेळगाव जिल्हा पंचायतीचे आरोग्य शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
अपघातात जखमी झालेल्यास स्वता च्या कार मधून हॉस्पिटल मध्ये पोचवून त्यांनी पुन्हा एकदा आपण जनतेचा चेहरा असून कसे लोकप्रिय असल्याचे दाखवून दिलय.रविवारी सकाळी वडगांव ते धामणे रोडवर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस त्यांनी इस्पितळात वेळेत दाखल करून त्याचा जीव वाचवला आहे.
वडगांव धामणे रोड येथे ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला होता अपघात करून ट्रॅक्टर चालकाने पलायन केले होते जखमी मात्र रक्त बंबाळ अवस्थेत विव्हळत पडला होता नेमकं त्या ठिकाणाहून रमेश गोरल हे आपल्या कार मधून धामणे येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात होते अश्या वेळेस त्यांनी पक्ष प्रचार बाजूला सारून त्या जखमी इसमास इस्पितळात पोचवणे महत्वाचे मानले आणि आपल्या गाडीतून रक्तबंबाळ अवस्थेत जखमी झालेल्या जोतिबा महादेव राजाई या केदनूर गावच्या इसमास इस्पितळात पोचवून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून रमेश गोरल यांच्यावर पक्षाने दक्षिण मतदार संघातील येळ्ळूर धामणे मच्छे पिरनवाडी ग्राम पंचायतीची जबाबदारी दिली आहे अश्यात ते सतत या भागात फिरत आहेत काँग्रेसचा लोकसभेच्या प्रचारा पेक्षा एका जखमीला वेळेत उपचार मिळणे महत्वाचे मानत त्यांनी माणुसकी दाखवून इतर राजकीय नेत्यांसमोर आदर्श घालून दिला आहे.