बेळगाव लोकसभेचे भाजप उमेदवार हे नेते नसून हवेवर निवडून येणारे वायूपुत्र आहेत असा टोला वन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुरेश अंगडी यांना लगावला आहे.बेळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
2004 च्या निवडणुकीत वाजपेयी यांच्या तर 2009 ला येडियुरप्पा यांच्या हवेत तर 2014च्या निवडणुकीत मोदी हवेत निवडणूक जिंकली होती.त्यांचा वैयक्तिक करिश्मा काहीच नसून तिन्ही वेळा त्यांनी वैयक्तिक ताकतीवर निवडून आले नाहीत असे म्हणाले.
देशात सध्या राहुल गांधी यांची हवा असून बेळगाव चिकोडी या दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार जिंकतील असा दावा देखील सतीश जारकीहोळी यांनी केला.काँग्रेसच्या सांगण्यावरून महाराष्ट्र एकीकरण समितीनं उमेदवार दिलेत असा आरोप सुरेश अंगडी यांनी काल केला होता त्यावर त्यांनी प्रत्त्युत्तर दिल आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती अगोदर पासून भाजपच्या बाजूने आहे.भाजपच्या गोष्टी मराठी भाषिक ऐकत असतात एम ई एस ने आपलं आपण निवडणूक लढवली असून यामागे काँग्रेसचा कोणताच रोल नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.