कोल्हापूरहून जोतिबा देवदर्शन आटोपून परत येत असतेवेळी ताबा सुटल्याने समोरून जाणाऱ्या कारला पाठीमागून दुचाकीने दिलेल्या धडकेत गाडीवर स्वार सात वर्षीय बालक ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना पुणे बंगळुरु हायवेवर संकेश्वर जवळ घडली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली आहे.
आयुष शिवानंद गावकर वय (सात वर्षे ) रा. चव्हाट गल्ली बेळगाव असे या अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोतिबा दर्शन घेऊन बेळगावकडे परतत असतेवेळी संकेश्वर जवळ कारला दुचाकीने धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकी चालक राजेश प्रकाश पट्टण रा. सुळगा(हिं)हा जखमी झाला आहे आयुष हा दुचाकीवर मध्ये बसला होता तर त्याची आई रुतिका शिवानंद गावकर या मागे बसल्या होत्या. आयुष हा जागीच ठार झाला आहे. तर मोटारसायकल चे नुकसान झाले आहे.
मयत आयुष हा समिती पब्लीक स्कुल बेळगाव मध्ये पहिलीच्या वर्गात शिकत होता.
Trending Now