भारत पाक युद्धात सहभागी झालेले निवृत्त कर्नल प्रकाश मिठारे वय 73 रा. रक्षक कॉलनी विजयनगर बेळगाव यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे.शनिवारी दुपारी 1:20 च्या दरम्यान त्यांचं निधन झालं असून सायंकाळी सात वाजता त्यांच्या विजय नगर येथील घरातुन अंतिम संस्कार मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.
सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.त्यांच्या पश्चात सून नात विवाहित मुलगी भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे.
कर्नल प्रकाश मिठारे यांचा 1962 भारत चीन आणि 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात समावेश होता.2012-13 साली त्यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे उपप्रांतपाल म्हणून कार्य केलं होतं