समिती उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन

0
449
Mes prachar office
 belgaum

अधिकाधिक उमेदवार का बसवले गेले ही समितीची भूमिका मराठी जनतेला पटवून देणे गरजेचे आहे असे आवाहन जेष्ठ वकील सीमा प्रश्नाचे जाणते नेते राम आपटे यांनी व्यक्त केलं.रंगुबाई पॅलेस येथे लोकसभा निवडणुकीच्या 45 उमेदवारांचा प्रचार कार्यालयाचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते.यावेळी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,प्रकाश मरगाळे हजर होते.

45 उमेदवार का लढवत आहोत लढ्याचा भाग म्हणून आपण ही भूमिका घेतली असून ही भूमिका जनतेत रुजवली पाहिजे याचे परिवर्तन मतात व्हायला हवं असे  ते म्हणाले.

Mes prachar office

 belgaum

आपली भूमिका न्यायाची असून पत्रकाच्या माध्यमातून लोकांना समजावून देऊ यासाठी अधिक समग्र पत्रक काढू अशी भूमिका मांडली. यावेळी राजाभाऊ पाटील ,विकास कलघटगी,सरस्वती पाटील,मनोहर किणेकर,आर आय पाटील,शिवराज पाटिल,गणेश दड़ीकर आदि उपस्थित होते. उद्या शुक्रवारी दुपारी ओरिएंटल सभागृहात उमेदवार आणि मुख्य कार्यकर्त्यांची सभा होणार असून त्या नंतर प्रचार यंत्रणा जोरदार पणे राबवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.