Friday, April 26, 2024

/

देशहित जपणाऱ्यानाचं श्रीरामसेना(हिं) संघटनेचा पाठिंबा’

 belgaum

श्रीराम सेना हिंदुस्तान ही संघटना कोणत्याच राजकीय पक्षाचे समर्थन करत नाही मात्र देशहित आणि हिंदुत्वा साठी योगदान म्हणून मोदींना पाठिंबा देत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहित आणि हिंदुत्वासाठी योगदान दिले आहे जर का भविष्यात काँग्रेसचे राहुल गांधी यांनी देशहित आणि हिंदुत्वासाठी योगदान दिल्यास त्यांना देखील पाठिंबा देऊ असे मत श्री राम सेना हिंदुस्थान चे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केले.

गुरुवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राम मंदिर निर्माण झाले पाहिजे काश्मीर मधून 371 कलम रद्द झाला पाहिजे गोहत्त्या बंदी करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ असेही ते म्हणाले.

Ramakant konduskar

 belgaum

13 रोजी राम नवमी निमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार असून शिवानंद गुरुजी,कैवल्यनाथ महा स्वामीजी या शोभा यात्रेत सहभागी होणार आहेत.

आंबेडकर उद्यान येथून मिरवणुक  पाच वाजता सुरू होईल असे ते म्हणाले.श्री रामसेनेच्या या मिरवणुकीसाठी खास महिलांचे लेझीम पथक तयार केलेलं आहे.यावेळी राजू जाधव भरत पाटील आदी श्रीराम सेना हिंदुस्तान पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.