मागील पंधरा वर्षात काहीच न करू शकलेले आणि आपला प्रभाव न पाडलेले तसेच आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांना जोडून न ठेवता आलेले भाजपचे मागील तीन वेळेचे खासदार आणि या वेळचे पुन्हा उमेदवार सुरेश अंगडी यांना भाजप राज्य प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज चांगलेच झाडले आहे.
आरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांच्या बैठकीत त्यांनी जुन्या चुका दुरुस्त करून सर्व कार्यकर्त्यांना जुळवून घेऊन पुढे जाण्याचा सल्ला खासदार सुरेश अंगडी यांना दिला आहे.
खासदार सुरेश अंगडी यांच्या दृष्टीने हा घरचा आहेरच ठरला आहे .उमेदवार निवडीपासून खासदार सुरेश अंगडी यांना विरोध होता मात्र त्यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे चित्र प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पोचले यामुळे ते थेट आरभावी येथे भालचंद्र जारकीहोळी यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी मागे करून ठेवलेल्या चुका आपल्याला कशा घातक ठरू शकतात याची माहिती देऊन कार्यकर्त्यानी सर्व काही विसरून जाऊन चिकोडी आणि बेळगावच्या जागा निवडून आणा असे विधान केले आहे.
भाजप आपल्या वयोवृद्ध कार्यकर्त्यांना निवृत्त करत आहे. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्री होण्याची आपली शेवटची संधी असून आपल्याला जर मुख्यमंत्री पदावर तुम्हाला बघायचे असेल तर यावेळी कर्नाटकातून किमान 20 खासदार केंद्रासाठी निवडून देण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. अंगडी यांच्याबद्दल वारंवार स्थानिक पातळीवर तक्रारी झाल्या आहेत पंधरा वर्षात लोकसभा मतदारसंघात काहीच प्रभावी काम केले नाही असा आरोप त्यांच्यावर होता, मात्र आता खुद्द पक्षांच्या प्रमुखांनी हाच आरोप करून चुका सुधारून घ्या, कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या, त्यांच्याशी मिळून-मिसळून काम करा आणि निवडणूक लढवा अशी सूचना दिल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. सध्या प्रचार सुरू असला तरी कार्यकर्ते एकीकडे आणि अंगडी दुसरीकडे असे चित्र आहे, ते वेगवेगळ्या भागात प्रचार करत असून सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पुढे जात नाहीत ,अशा तक्रारी यांच्याकडे वाढले आहेत. आरएसएस आणि भाजपशी समन्वय साधून काम करण्याची गरज असताना आपले वैयक्तिक कार्यकर्ते जमवून त्यांच्या माध्यमातून प्रचार करत आहेत त्यामुळे येडियुरप्पा यांनी नाराजी व्यक्त करून त्यांना चांगलेच झाडले आहे.