कितीही उन्हाळा वाढला तरी बेळगाव परिसरातील निसर्गरम्यता कमी होत नाही, अशा ठिकाणी जाऊन सेल्फी व फोटोसेशनसाठी तरुणाईची गर्दी वाढत आहे.हा परिसर सेल्फी पॉईंट ठरत आहे.
बेळगाव शहर निसर्गसंपन्न आहे. त्यामुळे त्याला दुसरे महाबळेश्वर असे म्हणतात. सध्या बेळगाव शहराच्या विविध मार्गावर तरुणाईची फोटोसेशन ला गर्दी होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून हे प्रमाण कमी असले तरी लवकरच आता ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
बेळगाव आणि उपनगरी भागातील काही ठिकाणी ही गर्दी होताना दिसून येत आहे. विशेष करून पावसाळ्यात तरुणाईची गर्दी अधिक असते. बेळगाव शहर आणि इतर ठिकाणी ही गर्दी वाढत आहे. हिरव्यागार आणि रम्य परिसरात ही तरुणाई आपले फोटो सेशनला महत्त्व देत आहे. बेळगाव शहर परिसरात असलेल्या काही ठिकाणी तरुणी खास फोटोसेशनसाठी जात असून ते फोटो फेसबुक किंवा व्हाट्सअप च्या माध्यमातून अपलोड करताना दिसून येत आहेत.
निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना आपण सुरक्षित आहोत याची काळजी घेणे देखील सध्या तरुणांनी गरजेचे आहे. निसर्गाचे सौंदर्य आपल्या समवेत कॅमेऱ्यात टिपले जावे तसेच आपल्या हुल्लडबाजी व स्टंटमुळे इतरांना अडचण निर्माण होऊ नये याची काळजी देखील तरुणवर्गाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवस सुट्टी असल्याने अनेक ठिकाणी फोटोसेशनसाठी तरुण गर्दी करणार आहेत. त्यांनी भान बाळगून वागणे महत्वाचे आहे.
सध्यातरी हिरवागार निसर्ग नसला तरी काही ठिकाणी अजूनही रम्य वातावरण आहे. त्यामुळेच तरुणही अनेक ठिकाणी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे विशेष करून शहराच्या लगत असणाऱ्या विविध भागात फोटो सेशन साठी ही गर्दी करत असून येत्या काळात या गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे.