संजय घोडावत यांच्या मालकीच्या स्टार एअर कम्पनीने अखेर बेळगाव अहमदाबाद विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून आता 15 मे पासून बेळगाव अहमदाबाद ही विमान सेवा दररोज सुरू होणार आहे.
केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात स्टार एअरला बेळगाव अहमदाबाद हा रूट मिळाला होता मात्र ही विमान सेवा कधी सुरू होणार हे जाहीर झाले नव्हते शेवटी आज तारीख जाहीर झाली असून आजपासून महिन्यांनी ही विमान सेवा सुरू होईल.
स्टार एअरने बेळगाव अहमदाबाद 2999 रुपयांत प्रवास सुरुवात केली आहे
बेळगाव ते अहमदाबाद असे असेेेल वेळापत्रक
बेळगाव( IXG) Deprt | अहमदाबाद (AMD) Arrival | ||
OG-107 | 09:20 | 11:05 | रविवार सोडून दररोज |
OG-107 | 16:40 | 18:15 | फक्त रविवारी |
अहमदाबाद( AMD) Deprt | बेळगाव (IXG) Arrival | ||
OG-108 | 11:25 | 13:00 | रविवार सोडून दररोज |
OG-108 | 18:45 | 20:20 | फक्त रविवारी |
बेळगाव हुन गुजरात राजस्थान ला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे रेल्वे गाड्या नेहमी फुल्ल असतात त्यात ही विमानसेवा गुजराती राजस्थानी आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायदेशीत ठरणार आहे .या शिवाय अहमदाबाद थेट बेळगाव विमान तळाशी जोडल्याने उत्तर भारतातील महत्वाच्या शहरांशी बेळगावची कनेक्टिव्हिटी वाढायला मदत होणार आहे.