बेळगाव शहरात आज दुपारी पडलेल्या पावसाने काही काळ थंडाई निर्माण निर्माण केली होती बेळगावच्या शहरवासीयांना गारव्याचा अनुभव आला प्रचंड वारा जोरदार वारा आणि विजांचा कडकडाट अशा वातावरणात सलग एक तास शहराच्या वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळत राहिला .
बेळगाव शहराच्या बरोबरीने उपनगरी भागात पावसाने आपला मारा केला असून काही काळ थंडाई निर्माण झाली होती मात्र त्यानंतर पुन्हा उष्णतेत वाढ झाली आहे. बेळगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अशी परिस्थिती असल्यामुळे नागरिक हैराण होत आहेत अशा परिस्थितीत दुपारनंतर आकाशात ढग दाटू लागले लागले होते आणि साडेचार ते पाचच्या दरम्यान पाऊस कोसळू लागला.
वडगाव अनगोळ टिळकवाडी बेळगाव शहर आणि उपनगरी भागात पाऊस पडला त्याचबरोबरीने बेळगाव च्या ग्रामीण भागात पाऊस पडला असून पेरणीपूर्व मशागतीच्या तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना पाऊस लाभदायक आहे.
मात्र शहरी भागात सिमेंटचे जंगल वाढत असताना पाऊस पडून गेल्यानंतर परत उकाड्याचा त्रास होऊ लागला आहे.