आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 22 जागा जिंकल्यास राज्यातील संमिश्र सरकार निवडणुकी नंतर टिकणार नाही असे भाकीत माजी मुख्यमंत्री भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडियुरप्पा यांनी केलं आहे.रविवारी सकाळी बेळगावातील सांबरा विमान तळावर ते पत्रकारांशी बोलत होते.
नरेंद्र मोदी यांच्या राज्य कारभारावर देशातील जनता आनंदी असून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार अस्तित्वात येईल राज्यात एकूण 28 पैकी 22 जागा जिंकणे हे उद्दिष्ट ठेवले आहे असे ते म्हणाले.राज्य सरकार आपली जबाबदारी आणि कर्तव्य विसरले आहे त्यामुळे जनता लोकसभेत भाजपाला मतदान करेल संमिश्र सरकारच्या कारभारावर जनता नाराज आहे.
केवळ एक किंवा दोन जागेवर बदल होऊ शकतो राज्यातील सर्व खासदार पुन्हा निवडणूक लढवतील असेही ते म्हणाले. वाजपेयींच्या काळात मसूद अझर ला सोडण्यात आले या राहुल गांधी यांच्या वक्तव्या वर बोलताना ते म्हणाले त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आज वेगळी आहे या विधानावर राहूल गांधी यांचा बेजबाबदार पणा दिसतो असे म्हणाले.
यावेळी खासदार सुरेश अंगडी,प्रभाकर कोरे आदी उपस्थित होते.