पाठीमागून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात येळ्ळूरची विवाहित महिला जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना वडगांव येळ्ळूर रोडवर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे.
रूपा जोतिबा घाडी वय 35 (मूळ रा. तानाजी गल्ली येळ्ळूर )सध्या आनंद नगर वडगांव असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचं नाव आहे. पती जोतिबा हे किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अपघात येळ्ळूर के एल इ इस्पितळा जवळ घडला आहे.जोतिबा घाडी हे आपल्या पत्नी रूपा सह येळ्ळूर हुन वडगांव कडे येत होते त्यावेळी टिप्परने पाठी मागून जोराची धडक दिली व पलायन केले.अपघातात पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने टिप्परचा टायर मयत रूपाच्या डोक्यावरून गेल्याने चेंदामेंदा झाला होता.
टिप्परने हिट अँड रन केलं असून टिप्परचा शोध घेतला जात आहे.जोतिबा घाडी हे मूळचे येळ्ळूरचे असून आनंदनगर वडगांव येथे वास्तव्यास होते काही कामानिमित्त येळ्ळूरला गेले होते परत येते वेळी हा अपघात घडला आहे. जोतिबा हे लष्करातून सेवा निवृत्त झाले आहेत.रहदारी दक्षिण पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.