हॉटेल व्यवसायात म्युझिक आणि नृत्याला महत्व येत आहे. याच क्षेत्रात काम करणारे एक त्रिकुट स्थानिक तरुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करत आहे. या त्रिकुटात दोन तरुण आणि एका महिलेचा सहभाग आहे. सोशल गॅदरिंग च्या नावाने स्थानिक तरुणांना एकत्रित करून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचे काम हे त्रिकुट करत आहे.
ऋतुराज उंद्रे, भक्ती भाटिया, आणि हर्षद ऐल अशी त्यांची नावे आहेत. हिप्नॉटाईज इव्हेंट्स या नावाने त्यांनी आपल्या उपक्रमांना सुरुवात केली असून स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलेत सुधारणा घडवून ते व्यासपीठ मिळवून देत आहेत. काही खाजगी हॉटेलात डीजे म्हणून गाणी म्हणतानाच त्यांना ही कल्पना सुचली.
यापैकी ऋतुराज आणि भक्ती हे मूळचे बेळगावचे असले तरी बेंगलोरमध्ये स्थायिक झाले आहेत, आणि हर्षद हा बेळगावातच राहतो .त्यांनी नुकतेच एका हॉटेलमध्ये थीम पार्टी आयोजित केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलांना वाव मिळवून देण्याचे काम करणार आहेत.
गीताच्या तालावर गाणे आणि नाचणे हे बेळगावात केंव्हाच सुरू झाले आहे .मात्र डीजे गाण्याचे कार्यक्रम, कॉमेडी शो, मिमिक्री हे अजून बेळगावात आलेले नाही. असे इव्हेंट बेळगावात आयोजित करून अशा कलांमध्ये पारंगत स्थानिक कलाकारांना स्थान देण्याचे काम आम्ही करणार असल्याचे हर्षद ने सांगितले. ऋतुराज म्हणतो चांगल्या कलाकारांना बेळगावशी जोडून स्थानिक नागरिकांनाही करमणुकीचे साधन याद्वारे मिळू शकते.
याप्रकारचा पहिला इव्हेंट बेळगावच्या मॅरिएट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. शंभर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
बेंगलोर मधील डीजे विल्ली हिने या कार्यक्रमात कमाल केली. दर महिन्याला असा कार्यक्रम बेळगाव भरवण्याचा त्यांचा उद्देश आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी ते देणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.