तो कॅन्टीन चालवून आपल्या कुटुंबाचे उदर निर्वाह करतो अश्या मध्यम वर्गीय गरीब कॅन्टीन चालकाचे घर आगीत जळून खाक झाले आहे. मंगळवारी सकाळी घरात कुणीही नसताना फ्रिजला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली अन ही दुर्दैवी घटना घडली आहे.
विठ्ठल शंकर सूनगार रा. तेलिपाटील गल्ली शहापूर असे त्या घर आगीत भस्म झालेल्या कॅन्टीन चालकाचे नाव आहे.आगीत त्याने घरात आपल्या व्यवसायसाठी ठेवलेली 80 हजार रोख रक्कम,सोन्या चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू असे जवळपास सहा लाखांचे नुकसान झाले आहे.
आग लागली त्यावेळी विठ्ठल आणि त्यांची पत्नी शिवाजी उद्याना समोर कॅन्टीन चालवत होते तर दोन मुली आणि एक मुलगा शाळेला गेले होते त्यामुळे या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र संसारात लागणारी भांडी अन्नधान्य,कपडे आदी जीवनोपयोगी वस्तू जाळून खाक झाल्या.आग लागताच अग्निशामक दलाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले तोवर विठ्ठल यांचे घर भस्म झाले होते.या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा देखील नोंद झाला आहे.
तेलीपाटिल गल्लीतल्या या घटने नंतर या भागातील लोकांनी माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत काही साहित्याची मदत करणार आहेत अश्या वेळी गरीब परिस्थितीत छोटे कॅन्टीन चालवून उदर निर्वाह करणाऱ्या विठ्ठलचा उघड्यावर पडलेला संसाराची घडी पुन्हा बसवायची आहे यासाठी त्याला गरज आहे ती आर्थिक मदतीची…