निवडणूक आचारसंहिता लागू होताच खासदार सुरेश अंगडी यांनी आपले सरकारी वाहन सोडून बसने प्रवास केला. या सगळ्या त्यांच्या युक्त्या आहेत पण यावेळी चालणार नाही असा आरोप विरोधकांनी केला आहे.
रविवारी सौन्दत्ती यल्लम्मा यात्रेसाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खासदार सुरेश अंगडी गेले होते. सकाळी जाताना ते आपल्या सरकारी वाहनातून गेले पण दुपारनंतर आचारसंहिता जाहीर होताच त्यांनी आपले वाहन सोडले. चालकाला हे वाहन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपव असे सांगून त्यांनी बसने बेळगावला येण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी बसमध्ये बसलेले अंगडी यांचे फोटो व्हायरल करण्यास सुरुवात केली, पण असल्या युक्त्या केल्यातरी अंगडींना यावेळी यश येणार नाही अश्या प्रतिक्रिया काँग्रेस आणि जेडीएस तर्फे देण्यात आल्या.
2009 मध्ये अंगडी दीड लाख मताधिक्क्यांनी निवडून आले होते.2014 मध्ये ते फक्त 70000 मताधिक्क्याने निवडून आले. यावेळी इतके मताधिक्क्य मिळणे अवघड आहे असे विरोधक बोलत आहेत.
अंगडी यांनी आपले वाहन लवकरात लवकर सोडून तत्परता दाखवल्याने याबद्दल त्यांच्या समर्थकांनी त्यांचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे.