निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. आणि 100 टक्के लोकांची नावे मतदार यादीत घालण्याची मोहीम बेळगावमध्ये सुरू आहे. यावेळी 100 टक्के मतदारांची नोंदणी करून घेण्याची तयारी सुरू आहे.
राजकीय पक्ष आपले मतदार जास्तीत जास्त नोंदणी करून घेतलेले असावेत याची काळजी घेत आहेत. आपल्याला जास्तीत जास्त मते मिळावीत म्हणून प्रयत्न करीत असून आम्ही मतदार म्हणूनही आमची जबाबदारी आहे याचा विचार करून मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे बघून मत ते नसल्यास घालून घेण्याची गरज आहे.
*मतदार यादीत नाव कसे शोधायचे?*
मतदार यादीत नाव शोधल्यावर ते मिळाले तर खरोखर आनंद साजरा करायची गरज आहे. कारण भारतीय लोकशाहीत प्रतिनिधी निवडण्यासाठी ही खरी ओळख तुम्हाला मिळणार आहे.
जर तुमचे नाव मिळाले नाही तर (nvsp.in) वर जाऊन ‘Form6’.च्या लिंक वर क्लिक करावे. हाच फॉर्म आपला मतदारसंघ बदलायचा असेल तरी कामाला येतो.
हा अर्ज डाऊनलोड करून तो भरून आपण निवडणूक अधिकाऱ्यांनाही देऊ शकता.
आपल्या नावाबद्दल काही चुका असल्यास form 8 वर क्लिक करू शकता.
मतदारयादीत नाव दाखल करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल पर्यंत असून 1950 या हेल्प लाईन वर सुद्धा तुम्ही माहिती मिळवू शकता.
Sorry site open hot nhi