बेळगाव जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदार संघातील उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण लॉबिंग करत आहेत त्यात काय चुकीचे नाही.हायकमांड ज्याला उमेदवारी दिल त्याला निवडून आणण्यासाठी जिल्हा काँग्रेस प्रयत्न करेल.
निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार आहे.इच्छुकांनी आपली मते बैठकीत मांडण्यास काहीच हरकत नाही असे वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आपले बंधू चन्नराज हट्टीहोळी याना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यात काही वावगे नाही.माजी खासदार एस.बी.सिदनाळ देखील आपल्या मुलासाठी प्रयत्न करत आहेत.रामदुर्गाचे माजी आमदार अशोक पट्टण देखील प्रयत्नशील आहेत.दोन तीन दिवसात उमेदवार जाहीर होतील असेही जारकीहोळी म्हणाले.